SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ९३,९६० रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर रेग्युलर बेस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२५ आहे.

स्टेट बँकेत या पदांसाठी भरती

स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजर (इकोनॉमिस्ट ) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ३ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.MMGS-II ग्रेडसाठी भरती केली जाणार आहेय या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

स्टेट बँकेत परीक्षेशिवाय मिळणार नोकरी (SBI Recruitment Without Exam)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुमची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ६४,८२० ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता (Eligibility)

एसबीआयमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इकोनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत इकोनॉमिमेट्रिक्स/मॅथेमॅटिकल इकोनॉमिक्स/फाइनान्शियन इकोनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. सर्वात आधी sbi.bank.in वर जा.

यानंतर Careers सेक्शनवर जा. तिथे तुम्हाला Recruitment of Specialist cadre officer on Regular Basis वर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर लॉग इन करावेत.

यानंतर तुम्हाला नाव,पत्ता, तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे.

यानंतर अर्ज शुल्क भरुन तुम्ही फॉर्म सबमिट करावेत. यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dearness Allowance: मोठी बातमी ! राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना होळीचं गिफ्ट; ८ लाख निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा आर्थिक फायदा

IND vs ZIM T20 WC: झिम्बाब्वेचा दारूण पराभव; भारत उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर; हार्दिक बनला विजयाचा हिरो

रश्मिका मंदाना अन् विजय देवरकोंडा अकडले लग्न बंधनात; कपलची एक कृती ठरली चर्चेचा विषय

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT