SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत सरकारी नोकरी; मिळणार पगार १.५ लाख; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत सध्या मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

मॅनेजर पदासाठी भरती सुरु

पगार मिळणार १.५ लाख रुपये

बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर (क्रेडिट अॅनालिस्ट) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रेड स्केल ३ अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. स्टेट बँकेतील ही भरती एकूण ६३ पदांसाठी होणार आहे. त्यातील रेग्युलर ५८ पदे भरली जाणार आहेत तर बॅकलॉगसाठी ५ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ३५ असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय निवड होणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

स्टेट बँकेतील नोकरीसाठी पात्रता

स्टेट बँकेतील मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत एमबीए (फायनान्स)PGDBA/PGDBM/MMS (फाइनान्स)/सीए/सीएफए/ICWA पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. याचसोबत ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

पगार

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल ३ पदावर नियुक्त केले जाणार आहे. यासाठी ६ महिन्याचा प्रोबेशन कालावधी असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ८५,९२० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्ते, एचआरए, डीए, पीएफदेखील मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...तर एकही विमान उडू देणार नाही; नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर भूमीपूत्रांकडून घोषणाबाजी

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

ManaChe Shlok: ...तर 'मनाचे श्लोक' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; हिंदू संघटना आक्रमक, कारण काय?

Maharashtra Politics: मोठी बातमी! PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक, आमदार-खासदारांना देणार कानमंत्र

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी! शिपाई ते अधिकारी, कोणाचा पगार कितीने वाढणार?

SCROLL FOR NEXT