SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँकेत सरकारी नोकरीची संधी; २६०० पदांसाठी निघाली भरती; पगार ८५९२० रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सध्या सर्किल ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. सरकारी बँकेत अधिकारी होण्याची ही उत्तम संधी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेने २६०० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत स्टेट बँकेने नोटिफिकेशन जारी केले होते. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ९ मे म्हणजे आजपासून सुरु झाली आहे. (SBI Recruitment)

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी (SBI Recruitment) अर्जप्रक्रिया आयबीपीएसद्वारे सुरु करण्यात आली आहे. तुम्हीibps च्या ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२५ आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करावेत.

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची भरती वेगवेगळ्या राज्यांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी परीक्षा ही जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात ३५० जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. उरलेल्या पदांसाठी संपूर्ण देशात भरती केली जाणार आहे.

पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडियातील या नोकरीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी मेडिकल, इंजिनियरिंग, चार्टड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी सुरुवातीला बेसिक पे ४८,४८० रुपये मिळणार आहे. ४८४८० ते ८५९२० रुपयांपर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे. याचसोबत इतर भत्ते वेगळे असणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT