SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment : ४५ लाखांचे पॅकेज, परीक्षेशिवाय SBI मध्ये नोकरीची संधी; नेमकी पात्रता काय?

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्य उमेदवारांना ४५ लाखांचे पॅकेज मिळणार आहे.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ज्या तरुणांना सरकारी बँकेत नोकरी करायची आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ५८ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.नोकरीसाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर अर्ज करु शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२४ आहे. डेप्युटी वीसी (आयटी आर्किटेक), असिस्टंट विसी, सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट वाइस प्रेसिडंट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. नोकरी करण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे लय ४५ वर्ष असावे. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवारांची निवड परिक्षेच्या आधारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी पदानुसार वेतन दिले जाणार आहे. काही पदांसाठी सीटीसी ३५ ते ४५ लाख रुपये आहे. याबाबत सर्व माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियासोबतच सध्या आयडीबीआय बँकमध्येही अधिकारी पदासठी भरती करण्यात येणार आहे.आयडीबीआय बँकेत ५६ पदांसाठी भरती केली जाणार आहे. ग्रेड सी आणि ग्रेड बी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT