SBI Job Saam Tv
naukri-job-news

SBI Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी, पॅकेज ४४ लाख; ९९६ जागांसाठी भरती; आजच अर्ज करा

SBI SCO Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्यातडे आहे. स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२५ होती. त्यानंतर आता ही तारीख वाढवून १० जानेवारी २०२६ करण्यात आली आहे. अनेक उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

९९६ पदांसाठी भरती जाहीर

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास ९०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. वीपी हेलथ, एवीपी हेल्थ, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण ९९६ जागा रिक्त आहेत. या पदांसाठी वेगवेगळ्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

स्टेट बँकेतील वीपी हेल्थ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत ६ वर्षांचा अनुभव असावा. एवीपी हेल्थ पदासाठी ग्रॅज्युएशन आणि रिलेशनशिप मॅनेजर पदावर ३ वर्ष काम केलेले असावे. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ग्रॅज्युएशन केलेले असावे.

पगार

स्टेट बँकेत वीपी हेल्थ पदासाठी ४४.७० लाखांचे पॅकेज मिळणार आहे. एवीपी वेल्थ पदासाठी ३०.२० लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी ६.२० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. त्यामुळे इच्छुकांसाठी ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

Diva Travel : 'दिव्या'जवळील ७ विरंगुळ्याची ठिकाणे, शहराच्या गोंगाटापासून दूर प्लान करा वन डे ट्रिप

Vastu Shastra : तुमच्या किचनचा ओटा कोणत्या रंगाचा? वास्तू शास्त्रानुसार 'हे' रंग आहेत शुभ

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT