SBI Fellowship Saam Tv
naukri-job-news

SBI Fellowship: स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर; स्टायपेंड १.१० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Youth Fellowship 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने फेलोशिप जाहीर केली आहे. या फेलोशिपमध्ये तुम्हाला ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळणार आहे.

Siddhi Hande

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी

फेलोशिपसाठी रजिस्ट्रेशन सुरु

स्टायपेंड किती मिळणार?

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ग्रामीण भागात विकास करण्यासाठी तुम्हाला योगदान देता येणार आहे. यासाठी स्टेट बँकेने फेलोशिपसाठी रजिस्ट्रेश सुरु केले आहे. एसबीआय फाउंडेशनने यूथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम २०२६-२७अंतर्गत ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरु केले आहे.

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी अॅप्लिकेशन विंडो सुरु झाली आहे. या साठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या फेलोशिपसाठी अर्ज कसा करावा, स्टायपेड किती मिळणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

एसबीआय यूथ फॉर फेलोशिप काय आहे?

स्टेट बँकेचा यूथ फॉर इंडिया फेलोशिप ट्रेनिंग आधारित प्रोग्रामआहे. यामध्ये तरुणांना ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही फेलोशिप अनेक एनजीओ किंवा प्रोग्राम बेस्ड प्रोजेक्ट्स मिळून चालवतात.

या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ४ ऑक्टोबर २०२६ आधी बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. २१ ते ३२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा.

स्टायपेंड किती मिळणार?

या फेलोशिपसाठी तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचा खर्च १६००० रुपये मिळणार आहे. ट्रान्सपोर्ट खर्च २००० रुपये मिळणार आहे. प्रोजेक्टसंबंधित र्च २००० रुपये तर प्रोफेशनल लर्निंग अँड डेव्हलपमेंटसाठी १००० रुपये मिळणार आहे.फेलोशिप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना १,१०,००० रुपये एकत्र मिळणार आहे.

रजिस्ट्रेशन कसं करायचं?

सर्वात आधी तुम्हाला स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट youthforindia.org वर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला Latest Fellowship 2026-27 लिंकवर क्लिक करायचे आहे.

यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर ओटीपी टाका.

यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. तुम्हाला तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS नंतर Lenskart मध्ये 'ड्रेस कोड'वरून वाद; हिजाब चालतो, पण टिकली लावण्यावर बंदी? CEO ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: नारी शक्ती विधेयकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही: पंतप्रधान मोदी

Crime news: पोटचा गोळा की काळ? आईला चौथ्या मजल्यावरून ढकललं; कारण ऐकून तुमचंही रक्त सळसळेल

Amir Hamza: पाकिस्तानात 'धुरंधर' पुन्हा अ‍ॅक्टिव्ह? लोहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आमदाराचा पुतण्या, कोण आहे क्रिश भगत?

SCROLL FOR NEXT