रेल्वेमध्ये मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या अंतर्गत अनेक पदासांठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या पदामध्ये पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर (Chief Law Officer) , पब्लिक प्रोसिक्यूटर (public prosecutor) , कनिष्ठ हिंदी अनुवादक,(Junior Hindi Translator,) लायब्रेरियन (Librarian) आणि प्रायमरी रेल्वे टीचर ( Primary NotificationRailway Teacher.) पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या तारखेपर्यंत अर्जाचे शुल्कही भरता येणार आहे. रेल्वेने एकूण 1036 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित विषयात बॅचलर, पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
अध्यापन पदांसाठी बीएड, डीएलएड किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना पाहावी. अर्जाची फी सर्व श्रेणींसाठी वेगळी ठेवण्यात आलीय. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी शुल्क 500 रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर SC आणि ST साठी 250 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.
परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग पद्धतीने भरता येईल. सामान्य, OBC यांना 400 रुपये आणि SC, ST ला स्टेज I परीक्षेनंतर 250 रुपये परत केले जातील. रेल्वेमधील नोकरी मिळण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 33-48 वर्षे दरम्यान असावे. याची गणना 1 जानेवारी 2025 च्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 19,900 रुपये ते 47,600 रुपये मासिक वेतन मिळेल. यासाठीचे अर्ज अद्याप सुरू झाले नाहीत, अर्ज उघडताच त्यांची माहिती अधिकृत साइटवर अपडेट केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावीत.
रेल्वेने एकूण 1036 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित विषयात बॅचलर, पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अध्यापन पदांसाठी बीएड, डीएलएड किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना पाहावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.