Jobs  Saam tv
naukri-job-news

Job: तरुणांना नोकरीचा अर्ज करण्याची शेवटची संधी; तब्बल 400 हून अधिक पदांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

SGPIMS Recruitment: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नोकरीची उत्तम संधी आहे. ४१९ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सकडून भरती राबवण्यात आली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून २५ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा.

संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ४१९ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर, स्टेनोग्राफर, टेक्निशियन या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी वयाची कोणतीही अट देण्यात आली नाही. पदानुसार अनुभव आणि वयाची अट देण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. sgpgims.org.in या वेबसाइटवर भरतीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ही भरती उत्तर प्रदेशसाठी आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ४४,९०० ते १,४२,४०० रुपये पगार देण्यात येणार आहे. नर्सिंग ऑफिसरच्या पदासाठी हा पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य श्रेणीतील लोक आणि OBC/EWS प्रवर्गातील लोकांसाठी ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST प्रवर्गातील लोकांना ७०८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT