RRB JE भर्ती 2024 Saam Tv
naukri-job-news

RRB JE भर्ती 2024: तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल ७९३४ पदांसाठी मेगाभरती; अर्ज कुठे अन् कसा करायचा? जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वेकडून अर्थात आरआरबीकडून कालपासून कनिष्ठ अभियंता पदांसाठी असलेल्या अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रक्रिया सुरु झालेली आहे.या भरती प्रक्रियेद्वारे साधारण ७९५१ JE पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता ते त्यांच्या असलेल्या क्षेत्राशी निगडित ''आरआरबी'' च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्जामध्ये आवश्यक असा बदल करु शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे कनिष्ठ अभियंता पदासाठी पदे भरली जाणार आहेत. ही भरती(recruiting) प्रक्रिया तीन टप्प्यात राबली जाणार असल्याचे समोर येत आहे. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा संगणकावर आधारित असलेली परिक्षा असेल. त्यानंतर कादगपत्र पडताळणीची प्रक्रिया पार पडेल. मग यानंतर उमेदवारांची वैद्यकिय तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या अंतिम मुलांकाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

परिक्षा शुल्क

या भरती प्रक्रियेसाठी असलेल्या अर्जात कोणताही बदल करण्यासाठी अर्थात अर्ज भरण्यासाठी २५० रुपये भरावे लागतील. फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२४ आहे.यामध्ये उमेदवारांना त्यांचा वयक्तित ईमेल (email)आयडी शिवाय मोबाईल नंबर तसेच निवडलेल्या आरआरबी सोडून इतर आवश्यक तपशीलांमध्ये बदल करता येऊ शकतात.

आरआरबी कनिष्ठ अभियंता अर्ज प्रक्रिया सुधारणा

पहिल्यांदा सर्व उमेदवारांनी आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर असलेल्या पहिल्या पेजवरील जीई भर्ती (Recruitment)ही लिंक क्लिक करावी लागेल. तिसऱ्या पायरीला उमेदवारांना एक नवीन पेज दिसेल,जिथे आवश्यक असे क्रेडेन्शियल भरावे लागतील. सर्व हे झाल्यानंतर तिथे सबमिट ऑप्शन असेल तेथे क्लिक केल्यानंतर उमेदवारांचा अर्ज समोर येईल. तुम्हाला हवा असल्यास फॉर्ममध्ये आवश्यक तो बदल करु शकता.अर्ज सबमिट केल्यानंतर नमुद केलेली अर्ज फी भरावी.मग शेवटी या भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT