Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२००० पदांसाठी भरती; अट फक्त १० वी पास; अर्ज कसा करावा?

RRB Group D vacancy 2025: रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत २२००० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर

२२००० पदांसाठी होणार भरती

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. तुम्हालाही रेल्वेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेच्या ग्रुप डीसाठी २२००० पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. सध्या फक्त अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्जप्रक्रिया लवकरच सुरु होईल.

ग्रुप डीमध्ये सर्वाधिक पदे ही ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV साठी आहेत. या पदासाठी एकूण ११,००० जागा रिक्त आहेत. यानंतर प्वॉइंट्समॅन, असिस्टंट पदावर भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात.

या पदांसाठी भरती (Railway Group D Recruitment)

रेल्वेत असिस्टंट (ट्रॅक मशीन), असिस्टंट (ब्रिज), ट्रॅक मॅनेजर, असिस्टंट (पी-वे), असिस्टंट (टीआरडी), असिस्टंट लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, पॉइंट्समॅन बी पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल एफिशिएंसी टेस्ट, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर सुरुवातीला १८००० रुपये पगार मिळणार आहे.

पात्रता

रेल्वेतील ग्रुप डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात आयटीआय केलेले असावे.याबाबतची सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे. याबाबत अर्जप्रक्रिया जानेवारीत सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT