RITES Recruitment  Saam Tv
naukri-job-news

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

RITES Recruitment 2025: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरीची संधी आहे. टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती केली जात आहे.

Siddhi Hande

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरी

टेक्निकल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर

लेखी परीक्षेद्वारे केली निवड

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सिनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२५ असणार आहे. एकूण १५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. अनुभव आणि फ्रेशर्ससाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे.

राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल फिल्डमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे.

राइट्समधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचावी. त्यानंतर अर्ज करावेत.

पगार (Salary)

राइट्समधील नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला १६,३३८ ते २९,७३५ रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत एचआरए, ट्रॅव्हल भत्ता आणि मेडिकल सुविधादेखील मिळणार आहे. यामुळे तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

RITES मधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. या नोकरीसाठीची परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.यामध्ये तुम्हाला १२५ प्रश्न विचारले जाणार आहेत.यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा? (Application Process)

सर्वात आधी rites.com वर जा.

यानंतर तुम्हाला Career सेक्शनवर जाऊन Vacancy मध्ये जा.

यानंतर तुम्हाला RITES Recruitment 2025 अधिसूचनेवर क्लिक करायचे आहे.

यानंतर अप्लाय ऑनलाइन यावर क्लिक करा.

यानंतर सर्व माहिती भरावी. याचसोबत कागदपत्रे अपलोड करा.ऑनलाइन शुल्क भरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT