RITES Recruitment  Saam Tv
naukri-job-news

RITES Recruitment: खुशखबर! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

RITES Recruitment 2025: राइट्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राइट्स लिमिटेडमध्ये टेक्निकल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

राइट्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राइट्स लिमिटेडने ६०० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. राइट्समधील या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२५ आहे. या नोकरीबाबतची सर्व माहिती तुम्हाला rites.com या वेबसाइटवर मिळेल.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल, इलेक्ट्रिकल मॅकेनिकल किंवा इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा प्राप्त केलेला असावी.केमिस्ट्रीमध्ये बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत विविध पदांसाठी पात्रतादेखील वेगवेगळी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हा पात्रता पाहा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागणार आहे.

राइट्समधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २९,७३५ रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. तुम्हाला १२५ प्रश्न विचारले जातील. यामध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

  • सर्वात आधी rites.com वर जा.

  • यानंतर होमपेजवरील करिअर सेक्शनवर जा.

  • यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.

  • यानंतर काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फर्म सबमिट करुन प्रिंट आउट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT