RITES Recruitment  Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; २२३ रिक्त पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या

RITES Recruitemnt: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २२३ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक लिमिटेड (RITES)मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राइट्समध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. करिअरची सुरुवात करण्यासाठी ही चांगली संधी आहे. (Government job)

राइट्समध्ये ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रकिया ६ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

रेल इंडिया टेक्निकल अँड इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२४ आहे.ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी ११२ रिक्त जागा आहे. डिप्लोमा अप्रेंटिससाठी २९ रिक्त जागा आहे.ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ४६ जागा रिक्त आहेत. (RITES Recruitment)

राइट्समध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराने (B.E/B.Tech/B.Atch)इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. डिप्लोमा अप्रेंचिस पदासाठी इंजिनियरिंग केलेले असावे. तसेच ट्रेड अप्रेंटिस पदासाठी आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १४००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी २५ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (RITES Job News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT