Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: भारतीय रेल्वेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल १८००० जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Railway Assistant Loco Pilot Bharti: तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाने नवीन जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये लोको पायलटची भरती जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी लोको पायलट भरतीची संख्या १८७९९ करण्यात आली होती. याबाबत आता अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.

आरआरबी भरती २०२४ च्या अधिसूचनेनुसार एकूण १८७९९ जागांसाठी भरत करण्यात येणार आहे. यात मुंबई, कोलकत्ता, बेंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर अशा अनेक जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची निवड संगणक आधारित टेस्ट, कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय टेस्टनंतर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रेल्वे बोर्डाकडून निवडलेल्या अर्जदारांना पाठवण्यात येईल.

रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्र/ ITI/ डिप्लोमा केलेला असावा. या भरतीसाठी वयाटी अट देण्यात आली आहे. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या उमेदवारांना लेव्हल २ नुसार पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करताना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

रेल्वेत मागील एक वर्षात लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच रेल्वे बोर्डाने लोको पायलट भरतीच्या जागा वाढवल्या आहे. लोको पायलट जवळपास १८-१८ तास रेल्वे चालवतात. त्यामुळे त्यांना आरामाची गरज असते, असं रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच रेल्वे बोर्डाने यंदा लोको पायलटच्या जास्त जागा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने ५६९६ पदांवरुन १८७९९ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याचीच अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT