फैय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी
कसारा : कसाऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. कसारा स्टेशनजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याची घटना घडली. यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनवर मोठा परिणाम झाला आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वे विस्कळीत होऊन लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्टेशनजवळ पंचवी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेत एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याने इंजिन आणि एक बोगी पुढे मुंबईच्या दिशेने निघून गेली. काही अंतरावर जाऊन इंजिन आणि एक डब्बा पुढे जाऊन थांबला.
मनमाड-मुंबई पंचवटी एक्प्रेसने कसारा स्टेशन काही अंतरावर सोडल्याने इंजिनचा एक डब्बा पुढे गेल्याने एकच खळबळ उडाली. कसारा स्टेशनवर घडलेल्या घटनेने मध्य रेल्वेवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिन आणि डब्यामधील कंपलिंग तुटल्याची घटना घडली. कसारा स्टेशनजवळ ही घटना घडली. कसारा स्टेशनजवळ येताच मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. या घटनेत इंजिनपासून एक डबा वेगळा झाला.
कसाऱ्यावरून कल्याणकडे उशिरा धावण्याची शक्यता आहे. हे कपलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा पूर्ववत केली जाणार आहे. यामुळे रेल्वे ट्रॅकवर ही एक्स्प्रेस थांबली आहे. या घटनेनंतर तातडीने रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच ट्रेनमधील प्रवासीही खाली उतरल्याचं पाहायला मिळालं.
या घटनेने रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी डबा जोडण्याचं काम सुरु केलं. या कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्स्प्रेसची तुटलेली कपलिंग बसवण्यात आली. त्यानंतर मनमाड मुंबई-पंचवटी कल्याणच्या दिशेने निघाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.