Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत काम करण्याची संधी, पात्रता फक्त दहावी, तब्बल ९९७० जागांसाठी जम्बो भरती; अर्ज कधी अन् कुठे करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत लोको पायलट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर या नोकरीसाठी अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हीही रेल्वेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वेत सहायक लोको पायलट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ९९७० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

रेल्वेतील लोको पायलट पदासाठी भरतीची अधिसूचना २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत जारी होईल. त्यानंतर उमेदवार अर्ज करु शकतात. तरुणांसाठी रेल्वेत नोकर करण्याची ही उत्तम संधी आहे.

रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकारी यांच्यानुसार,अधिसूचना जारी झाल्यानंतर १० एप्रिल २०२५ पासून अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना जारी झाल्यानंतरच माहिती मिळेल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, सायकॉलॉजिल टेस्ट आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे होणार आहे.

२०२४ मध्येही लोको पायलट पदांसाठी भरती निघाली होती. त्यावेळी ज्या उमेदवारांना अर्ज करता आले नाही किंवा ते परीक्षा पास करु शकले नाही. त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा डिप्लोमा केलेला असावी. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचना जाहीर झाल्यावर मिळेल.

रेल्वेत करिअरची सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पोस्ट ऑफिस भरती

सध्या पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टेक्निकल सुपरवायजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केला असेल ते या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठीही अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT