Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; २५७० पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या २५७० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुच्याकडे आहे. रेल्वेत ऑक्टोबर महिन्यात नवीन भरती निघणार आहे. रेल्वेत विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २५७० पदांसाठी भरती केली जाणार आहे.

ज्युनिअर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट आणि मेकॅमिक मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.rrbapply.gov.i वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु होण्यासाठी अजून एका महिन्याचा कालावधी आहे. तुम्ही ३१ ऑक्टोबर २०२५ पासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी १८ ते ३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना लेव्हल ५ नुसार वेतन मिळणार आहे. त्यांना ३५४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

रेल्वे ज्युनिअर इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराना डिप्लोमा किंवा बी.ई/बीटेक केलेले असावे. कॉम्प्युटर सायन्स, आयटी डिप्लोमा आणि डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे. सीबीटी १, सीबीटी २ आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये पास झाल्यावर तुम्हाला सीबीटी २ द्यावी लागणार आहे.यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT