Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरी करण्याची संधी; ६००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या टेक्निशियन पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकड आहे. सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. अनेकजण रेल्वेच्या भरतीची वाट पाहत असतात. दरम्यान, अशा तरुणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे. रेल्वे भरती बोर्डाने तब्बल ६००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन ग्रेड १ आणि टेक्निशियन ग्रेड ३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचनादेखील जाहीर केली आहे.

रेल्वेमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २८ जून २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ असणार आहे.या कालावधीतच इच्छुकांनी अर्ज करावेत. (Railway Recruitment)

टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी १८० जागा रिक्त आहे. टेक्निशियन ग्रेड ३ ओपन लाइन पदासाठी ६००० जागा रिक्त आहेत. एकूण ६१८० रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.

टेक्निशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत NCVT/SCVT मधून आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. संबंधित ट्रेडमधून त्यांनी आयटीआय पूर्ण केलेले असावे.

पात्रता (Eligibility)

टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी ऑफ सायन्स फिजिक्स/ कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इन्स्ट्रुमेशनमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. किंवा बीएससी डिग्री इन फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केलेला असावा.

टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. टेक्निशियन ग्रेड १ पदासाठी कमाल वयोमर्यादा ३६ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पगार

या नोकरीसाठी टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी २९,२०० रुपये पगार आहे. टेक्निशियल ग्रेड ३ पदासाठी १९९०० रुपये पगार मिळणार आहे. अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये फी भरायची आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT