Excise Sub Inspector : राज्य उत्पादन शुल्क विभागात मेगा भरतीची सुवर्णसंधी; अर्ज कधी आणि कुठे कराल|VIDEO

MPSC Recruitment: राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती होणार आहे. MPSCने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमपीएससी मार्फत ही भरती होणार आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग आणि जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक, गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा मुंबई केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेची दिनांक ही स्वतंत्रपणे जाहीर् करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.

कधी पर्यंत आहे या अर्जाची मुदत-

अर्ज करण्याची तारीख- 10 जून ते 30 जून

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख-30 जून रात्री 11.59 मिनिटे

चलनद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख-30 जून रात्री 11.59 मिनिटे

एकून जागा- 137

यामध्ये जवान संवर्गांसाठी 115 पदे तर लिपिक संवर्गासाठी 22 पदे

दिव्यांग प्रवर्गासाठी एकून सहा पदे यामध्ये असणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com