Dhule : धुळ्यात ४० लाखांची दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, दोघे अटकेत

Dhule News : दोन ते तीन दिवसांपासून हे पथक कंटेनरच्या शोधत होते. याप्रकरणी चालक आणि क्लिनर यांना महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. यात आंतरराज्यीय टोळीचा या प्रकरणात सहभाग
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : बंदी असताना आजही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचे धुळ्यात झालेल्या कारवाईतून समोर आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्रात शुल्क चुकवून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४० लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त करण्यात आली असून यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. 

दारूची वाहतूक आणि विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील सर्रासपणे परराज्यातून दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अशाच प्रकारे धुळे जिल्ह्यातून ट्रकमधून वाहतूक केली जात असताना राज्य उत्पादन शुल्क चुकवून जाणार्यावर कारवाई करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सामोडे रोडावर सदरची कारवाई करण्यात आली आहे. 

Dhule News
Sangli : चक्क पाणी पिताना शेळ्यांनी गिळले सोन्याचे दागिने; शस्त्रक्रिया करत काढले चार ग्रॅम वजनाचे कर्णवेल

विदेशी दारू व बिअरचे बॉक्स आढळले 

एका ट्रक कंटेनरला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात दमन येथून आणलेली विदेशी दारू आणि बिअरचे ३०० बॉक्स आढळून आले. या दारूसह ३ मोबाईल असा एकूण ४० लाख ५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन ते तीन दिवसांपासून हे पथक कंटेनरच्या शोधत होते. याप्रकरणी चालक आणि क्लिनर यांना महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. यात आंतरराज्यीय टोळीचा या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता असून, अधिक तपास सुरू आहे.

Dhule News
Kalyan News: डॉ. बाबासाहेबांच्या वारसांच्या जमिनीवर अतिक्रमण, चक्क ७ मजली इमारत उभारली; KDMC चा भू-माफियांना दणका

ड्रग्स तस्करी प्रकरणात आणखी एकजण ताब्यात 
तुळजापुर ड्रग्स तस्करी प्रकरण गाजत असून यात आणखी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. तस्कर गटातील आरोपी नानासाहेब कुर्‍हाडे याला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातील वांगणी येथुन ताब्यात घेतले आहे. ड्रग्स तस्करी प्रकरणी धाराशिव पोलिस ऍक्शन मोडवर असून मागील तीन दिवसात तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर या प्रकरणात एकुण ३६ आरोपी असुन आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com