
सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. शहर महानगरपालिका, अग्निशमन व आप्तकालीन सेवा विभागाअंतर्गत अग्निशमन दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अग्निशामक विमोचक या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिकाद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी विभागात ही नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. एकूण १०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अग्निशामक विमोचक या पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत राज्य अग्निमशन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या ६ महिन्याचा पाठ्यक्रमाचा अभ्यास केलेला असावा. किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांचा १ वर्षांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा अभ्यास केलेला असावा.
या नोकरीसाठीचे ठिकाण हे नागपूर असणार आहे. अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल. तो भरुन तुम्हाला सबमिट करायचा आहे. ही भरती फक्त ४ महिन्याच्या कालावधीसाठी केली जाणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुकांनी १९ जून २०२५पर्यंत अर्ज करायचा आहे.यासाठी तुम्हाला अर्ज मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स नागपूर ४४०००१ येथे पाठवायचा आहे.
चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. संबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज पाठवण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे त्यापूर्वी अर्ज करावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.