Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ३६८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेक्शन कंट्रोलर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरीची संधी

सेक्शन कंट्रोलर ऑफिसर पदांसाठी भरती

पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज

अर्जप्रक्रिया जाणून घ्या

रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेत ऑफिसर होण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आले आहेत. रेल्वे भरती बोर्डाने नवीन भरतीबाबत शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. रेल्वे भरती बोर्डाने सेक्शन कंट्रोलर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने हे नोटिफिकेशन ऑफलाइन पद्धतीने जारी केले आहे.त्यानंतर आता ऑनलाइनदेखील जारी केले जाणार आहे. या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. तुम्ही www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२५ आहे.

रेल्वे सेक्शन कंट्रोलर या पदांसाठी ३६८ पदे भरती केली जाणार आहे. जर तुम्हाला रेल्वेत ऑफिसर व्हायचं असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.

रेल्वेतील या भरती मोहिमेत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मेडिकल टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना लेवल ६ नुसार पगार मिळणार आहे.

रेल्वे सेक्शन कंट्रोलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत २०-२३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. विविध ठिकाणी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क द्यायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी २५० रुपये शुल्क भरायचे आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.rrbapply.gov.in वर जायचे आहे.

यानंतर Latest Update वर जा. त्यानंतर अप्लायवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा. यानंतर पासवर्ड टाका.

यानंतर लॉग इन करुन सर्व माहिती भरा.

यानंतर फोटो, सही आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर शेवटी शुल्क भराय आणि फॉर्म डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

SCROLL FOR NEXT