Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: ७९५१ पदांसाठी रेल्वेत मोठी भरती; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये तब्बल ७९५१ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. रेल्वे भरती बोर्डाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

रेल्वेमधील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ म्हणजे उद्या आहे. ७९५१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. केमिकल सुपरवायजर,रिसर्च आणि मेटालर्जिकल सुपरवायजर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. तसेच ज्युनिअर इंजिनिअर, डेपो मटेरियल अधिक्षक या पदासाठीही रिक्त जागा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेली असावी. सायन्स शाखेतून बॅचरल डिग्री प्राप्त केलेले उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

१८ ते ३६ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला ५०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे. नोकरीसाठी उमेदवारांना ३५,४०० ते ४४,९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. https://www.rrbmumbai.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party Case : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खेवलकरांची उच्च न्यायालयात धाव, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे -सातारा महामार्गावर कंटेनरने ५ वाहनांना दिली धडक, ५ जण जखमी

Home Cleaning Tips: लादी पुसताना पाण्यात टाका मीठ, नकारात्मक ऊर्जा होईल दूर

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

SCROLL FOR NEXT