Railway Job Saam Tv
naukri-job-news

Railway Job: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ५६४७ रिक्त जागांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. ५६४७ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॉर्दन फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ५६४७ रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे.

नॉर्दन फ्रंटियर रेल्वेतील अप्रेंटिस पदाच्या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. NFR च्या अधिकृत वेबसाउटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा.nfr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. (Railway Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी, १२वी, ITI (NTC/STC) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १४ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ३ डिसेंबर २०२४ पूर्वी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना अधिकृत वेबसाइटवर nfr.indianrailways.gov.in जावे. त्यानंतर वेबसाइटवर अप्रेंटिसशिपसाठी नोटीफिकेश दिले असेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर करा. यानंतर लॉग इन करुन स्वतः ची माहिती अपलोड करा.यानंतर निर्धारित शुल्क जमा करुन अर्ज भरावा.या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा. (Railway Job 2024)

या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. त्याचसोबत करिअरची सुरुवात करण्यासाठी चांगली संधी आहे. (Railway Recruitment 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

President's Rule : 26 तारखेला राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल का? अनंत कळसेंनी काय सांगितलं, पाहा VIDEO!

Kankavli Exit Poll: राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार का? कणकवलीचा एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

SCROLL FOR NEXT