बॉल टॅम्परिंगच्या आरोपांमुळं ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरचं अख्खं क्रिकेट करिअर पणाला लागलं होतं. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. पण ही बंदी उठली. पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरून जोरदार कमबॅक केलं. आता जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, वॉर्नरला देशातील सर्वात मोठ्या लीगमधील संघाचं कर्णधार केलंय. बिग बॅश लिग (BBL) मधील सिडनी थंडर्सच्या कर्णधारपदी त्याची नेमणूक केली आहे.
बॉल टॅम्परिंगचं प्रकरण डेविड वॉर्नरच्या चांगलंच अंगाशी आलं होतं. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानं त्याच्यावर बंदी घातली होती. काही दिवसांपूर्वीच ही बंदी उठवण्यात आली. आता तो पुन्हा 'कॅप्टन' झालाय. बिग बॅश लीगमधील सिडनी थंडर्स संघाचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलं आहे.
केपटाऊनमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात वॅार्नरने चेंडूसोबत छेडछाड केली होती. या सर्व प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून डेव्हिड वॅार्नरच होता. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून रोखलं होतं.
सिडनी थंडर्स संघाचे पुन्हा नेतृत्व करणं ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. मी सुरुवातीपासून संघाचा भाग आहे. पुन्हा याच संघाचा भाग होणं आणि नावापुढे कॅप्टनचा 'C' लागणं हे अत्यंत विलक्षणीय आहे. संघाचे नेतृत्व करण्यासाठी आणि माझे अनुभव युवा पिढीसोबत शेअर करण्यासाठी मी तयार आहे, डेविड वॅार्नर याने सांगितले.
फक्त जिंकण्यासाठी नव्हे तर युवा खेळाडूंना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी वॉर्नरचा अनुभव मैदानावर आणि मैदानाबाहेरही उपयुक्त ठरेल. तसेच वॅार्नरची नियुक्ती संघासाठी आणि क्लबसाठी महत्वाची बाब आहे, असे संघाचे व्यवस्थापक ट्रेंट कोपलॅंड यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.