Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: तरुणांनो, सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; रेल्वेमध्ये ७९५१ पदांसाठी सुरु आहे भरती; असा करा अर्ज

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ७९५१ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट आहे.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. रेल्वे भरती बोर्डाने वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ७९५१ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची तारीख ३० जुलै २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी सर्व माहिती त्या त्या राज्याच्या RRB वेबासाइटवर देण्यात आली आहे.

रेल्वेमध्ये ज्युनिअर इंजिनिअर, डेपो मटेरिअल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट आहे. जर तुम्हाला तुमच्या अर्जात काही दुरुस्ती करायची असेल तर ८ सप्टेंबरपर्यंत करु शकतात. या भरतीमध्ये १७ पदे ही सुपरवाइजर/रिसर्च अँड मेटालर्जिकल सुपरवाइजर यासाठी आहे. ही पदे फक्त आरआरबी गोरखपूर साठी आहे.

या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनिअर आणि डेपो मटेरियल सुपरिटेडंट पदासाठी बीई किंवा बीटेक पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंटच्या पदासाठी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह बीएससी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी २५० रुपये अर्ज फी आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर केली जाईल. यासाठी उमेदवारांना CBT 1, CBT II लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. या दोन परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल.या सर्व परीक्षांमध्ये पास झाल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

या नोकरीसाठी पगार हा पदानुसार देण्यात येईल. ज्युनिअर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेडंट, केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट लेव्हल ६ पदासाठी ३५,४०० रुपये पगार मिळणार आहे. तर रिसर्ज अँड मेटलर्जिकल सुपरवायझर, केमिकल सुपरवायझर पदासाठी ४४,९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

SCROLL FOR NEXT