railway jobs  Saam tv
naukri-job-news

Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती; २२००० रिक्त जागांवर नोकरीची संधी; रेल्वे मंत्रालयाची मोठी घोषणा

Railway New Vacancy Annouced for 22000 Post: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत २२००० पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली जाईल.

Siddhi Hande

रेल्वेत सर्वात मोठी भरती

२२,००० पदांसाठी भरतीची घोषणा

लेव्हल १ आणि ग्रुप डी पदांसाठी होणार भरती

सरकारी नोकरी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यात जर रेल्वेत नोकरी मिळाली तर अनेक संधी तुमच्यासमोर खुल्या होतात. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न तुम्हीदेखील पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. रेल्वे मंत्रालयाने नवीन भरतीसाठी घोषणा केली आहे. रेल्वेने लेव्हल १ अंतर्गत पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेने लेव्हल १ च्या ११ कॅटेगरीअंतर्गत २२००० पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे.

आरआरबीचे चेअरमन संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जानेवारी २०२६ पर्यंत अर्जप्रक्रिया सुरु होऊ शकते. एकूण २२००० पदांसाठी भरती जाहीर केली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी भरती (Railway Recruitment 2025)

ट्रॅक मॅनेजर ग्रेड ४ पदासाठी ११००० जागा रिक्त आहेत. ट्राफिक बी पॉइंट पदासाठी ५००० जागा रिक्त आहे. असिस्टंट (एस एव टी) १५०० जागांसाठी होणार आहे. असिस्टंट (ऑपरेशन) पदासाठी ५०० जागा रिक्त आहेत. असिस्टंट लोको शीट पदासाठी २०० जागा रिक्त आहेत. असिस्टंट टीआरडी पदासाठी ८०० जागा आहेत. असिस्टंट पी वे पदासाठी ३०० जागा रिक्त आहे. ट्रॅक मशीन असिस्टंट पदासाठी ६०० तर ब्रिज असिस्टंट पदासाठी ६०० जागा रिक्त आहेत.

ग्रुप डी पदांसाठी भरती

लेव्हल १ सोबतच ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वेने कोणत्याही प्रकारची अधिसूचना जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या नोकरीसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT