Pune MNC Recruitment Saam Tv
naukri-job-news

Pune MNC Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सर्व माहिती

Pune Municiapal Corporation Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात क्रिडा मार्गदर्शक पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

अनेक तरुणांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर पुणे महानगरपालिकेत भरती जाहीर करण्यात आली आहे.पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) क्रिडानिकेतन शाळेकरिता पदभरती करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.या नोकरीची जाहिरात महापालिका आयुक्त, पुण महानगरपालिका आणि शिक्षण विभागाद्वारे देण्यात आली आहे. तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचू शकतात.

पुणे महानगरपालिकेतील नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ५० वर्ष असावे. क्रिडा मार्गदर्शक पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

क्रिडा मार्गदर्शक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कबड्डी, खो-खो, हँडबॉल, थ्रो बॉल, योगासन, बॉल बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, ज्युदो, क्रिकेट हे खेळ खेळता आले पाहिजे. या नोकरीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर, बी.पी.एड किंवा बी.एड, एम.पी.एड, एन.आय.एस संस्थेचा ६ महिने किंवा १ वर्षाचा कोर्स केलेला उमेदवार अर्ज करु शकतो. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १ वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

पुणे महानगरपालिकेत १८ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे मनपा, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-४११००५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT