JOB Saam Tv
naukri-job-news

JOB: नोकरी शोधताय? पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Power Grid Corporation Limited Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्याची संधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ८०२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२४ आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल), ज्युनिअर ऑफिसर (HR/F&A),असिस्टंट ट्रेनी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. डिप्लोमा ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग डिप्लोमा पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअर ऑफिसर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट ट्रेनी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. कॉम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करताना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी अर्ज करायचा आहे. (Power Grid Corporation Limited Recruitment)

डीआरडीओमध्ये भरती

सध्या डीआरडीओमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. डीआरडीओ डिस्टिंग्विश फेलोशिप, डीआरडीओ फेलोशिप पदांसाठी भरती होणार आहे. २१ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १.२५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT