Post Office Bharti  Saam Tv
naukri-job-news

Post Office Bharti : १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी, पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल २१४१३ पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

Post Office Recruitment 2025: भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल २१४१३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

अनेकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वतीने ही भरती राबवण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

भारतीय डाक विभागात २१,४१३ ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वयोगटातील असेल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर भेट द्यावी लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्हाला दिलेली माहिती भरावी लागेल. यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यानंतर शुल्क भरुन अर्ज सबमिट करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सर्व माहिती भरायची आहे.

ब्रँच पोस्ट मास्टर पदासाठी १२,००० ते २९,३८० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक पदासाठी १०,००० ते २४,४७० रुपये पगार दिला जाणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT