PMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

PMC Recruitment 2025: पुणे महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

पुणे महानगरपालिकेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग यांच्या नियंत्रणाखाली इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर् पुणे महानगरपालिका अंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोद दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध रण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये जिल्हा पी.पी.एम समन्वयक, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (एस.टी..एस), टीबी हेल्थ व्हिजिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पी.पी.एम समन्वयक पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

एस.टी.एस पदासाठी बॅचलर डिग्री किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स केलेला असावा. टीवी हेल्थ विजिटर पदांसाठी सायन्समध्ये पदवी केलेली असावी. तसेच MPW/LHV/ANM आरोग्य कामगार म्हणून काम केलेले असावे. एकूण १२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी पगार २०,००० रुपये दिला जाणार आहे.

या नोकरीचे ठिकाण पुण्यात आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२५ आहे. तोपर्यंत शासकीय सुट्टी वगळता ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात.तुम्हाला इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र,६६६, शुक्रवार पेठ, मंडईजवळ, शिवाजीरोड येथे अर्ज पाठवायचा आहे.याबाबत सविस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे.

पुणे महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येईल. सरकारी विभागात काम करण्याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT