ONGC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ONGC Recruitment: सेवानिवृत्तीनंतरदेखील तुम्ही करु शकता नोकरी; ONGC मध्ये सुरु आहे भरती; वाचा सविस्तर

ONGC Recruitment For Retired Person: सेवानिवृत्तीनंतर अनेकांना घरात बसून कंटाळा येतो. तसेच अनेकांना आर्थिक मदतीची गरज असते. याच लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये नोकरीसाठी भरती सुरु आहे. ६४ वयाचे उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

भारतात कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष आहे. सेवानिवृत्तीनंतर अनेकांना घरी बसायला कंटाळा येतो. त्यांनी नेहमी कामाची सवय असते. तसेच अनेकांना आर्थिकदृष्ट्यादेखील गरज असते. याच लोकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेड (ONGC) मध्ये भरती सुरु आहे.

या भरतीसाठी ६४ वर्षांचे उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. ७० हून अधिक जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही भरती १ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

ही भरती ज्युनिअर कन्सलटंट आणि असोसिएट कन्सलटंट या पदासाठी केली जाणार आहे. या भरतीसाठी ६४ वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीक २३ जुलै आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ongcindia.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. तसेच याच क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या उमेदवारांची सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल. ज्युनिअर कन्सलटंट पदासाठी ४० हजार रुपये पगार मिळणार आहे तर असोसिएट कन्सलटंट पदासाठी ६६ हजार रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime : इंजिनिअर तरुणाने चोरल्या दुचाकी; सुटे पार्ट करत भंगारमध्ये विकले, ८ दुचाकींसह चोरटा ताब्यात

Agriculture Scheme: शेतात सिंचन व्यवस्था करायचीय? मग तयार करा शेततळं; सरकार देणार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

'काही चुका होणं स्वाभाविक' जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Maharashtra Live News Update: विक्रोळीत मुंबई महापालिकेच्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात तिरडी यात्रा

Bharat Gogawale: आज ना उद्या पद नक्कीच मिळेल, भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळण्याची आशा|VIDEO

SCROLL FOR NEXT