ONGC Recruitment Saam Tv
naukri-job-news

ONGC Job: परीक्षा नाही, थेट लाखोंच्या पगाराची नोकरी, ONGC मध्ये निघाली भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ONGC Recruitment: ओएनजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ओएनजीसीमध्ये मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही संधी आहे. ओएनजीसीमध्ये असोसिएट मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर आणि असोसिएट वाइस प्रेसिडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (ONGC Recruitment)

ओएनजीसीमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. त्यासाठी तुम्हाला ongcindia.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.

ओएनजीसीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (ONGC Bharti 2024)

ओएनजीसीमधील या भरतीमध्ये ४० ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. असोसिएट मॅनेजर ऑपरेशन आणि मेटेंनेंस पदासाठी ४० वर्षे कमाल वयोमर्यादा आहे.प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी.

असोसिएट मॅनेजर पदासाठी २२ लाख रुपये पॅकेज देण्यात येणार आहे. तर मॅनेजर पदासाठी २७.५० लाखांचे पॅकेज मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पात्रता, अनुभव आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. यानंतर उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग होऊन पुन्हा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

सेंट्रल बँक भरती

सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. सेंट्रल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे. ६२ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही centralbankofindia.co.in च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.डेटा इंजिनियर ते ग्राफीक डिझाइनर, मार्केट स्पेशलिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT