Jobs News: जनरेशन 'Z' ला नोकरीत नो एण्ट्री? बेफिकीरीमुळे कंपन्यांचा नकार

Generation 'Z' Jobs : 'जनरेशन झेड' असलेल्या तरुणांना अनेक कंपन्या नोकऱ्या नाकारत आहेत. उथळपणा, वारंवार नोकरी सोडणे, बेफिकीरपणा यामुळे या जनरेशनच्या तरुणाईला कंपन्या नोकरी नाकारत आहेत. पाहूयात एक रिपोर्ट
Generation 'Z'
Generation 'Z' Jobs Google
Published On

1990 च्या उत्तरार्धात आणि 2000 च्या सुरुवातीस जन्मलेल्या तरूणांना 'जनरेशन झेड' म्हणतात. पहिलं तर ही पिढी इंटरनेटच्या सहाय्याने मोठी झालेली पहिली पिढी आहे. हे तरुण उत्साहाने भरलेले आहेत. मात्र कंपन्या त्यांना कामावर घेण्यास नाखूष आहेत. अनेक मोठ्या कंपन्या जनरेशन झेड यांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत आहेत.

अनेक कंपन्या कामावर घेतल्यानंतर काही महिन्यांतच तरुणांना नोकरीवरुन काढून टाकत आहेत. कारण त्यांची काम करण्याची शैली, संवाद कौशल्य आणि कामाबद्दलची बेफिकीरी कंपन्यांना रुचणारी नाही. एका सर्वेक्षणात सुमारे 1,000 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. जगभरातील अनेक कंपन्या जनरेशन झेड कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहे.

Generation 'Z'
Railway Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 1036 पदांवर बंपर भरती, आजच करा अर्ज

नेमकी यामागची काय कारणं आहेत ते पाहूयात.

जनरेशन 'Z' ला नोकरीत का नो एण्ट्री?

व्यावसायिकतेचा अभाव

गती आहे पण उथळपणा

संभाषण कौशल्याचा अभाव

कामाबाबत गांभीर्य नसणं

कमी काळात नोकरी सोडणं

अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकटचा प्रयत्न

Generation 'Z'
NTPC Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? सरकारी नोकरीची संधी; NTPC मध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

या परिस्थितीसाठी अनेक तज्ज्ञांनी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले आहे. तरुणाईमध्ये संयम रुजवायला हवा. तसेच कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी सरावावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. संधीची नवीन दालनं उघडत आहेत. अशा वेळी 'जनरेशन झेड' नेही स्वत:मध्ये बदल करायला हवा...तरच मोठ्या कंपन्या त्यांना प्रतिसाद देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com