NTPC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NTPC Recruitment: NTPC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५५००० रुपये; अर्ज कसा करावा?

NTPC Recruitment 2025: एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे. एनटीपीसीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह (ऑपरेशन) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एनटीपीसीमध्ये ntpc.co.in या वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (NTPC Recruitment)

एनटीपीसीमध्ये ४०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. १ मार्चपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७२ पदे रिक्त आहेत. ईडब्लूएस पदासाठी ४० पदे रिक्त आहेत. इतर पदे राखीव प्रवर्गासाठी जागा आहेत. एकूण ४०० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षे होती.या नोकरीसाठी राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बी.ई/बी. टेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा अनुभव असायला हवा. (NTPC Job Recruitment)

एनटीपीसीमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ३०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५५,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग, लेखी परीक्षा आणि पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT