NTPC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NTPC Recruitment: एनटीपीसीमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १८२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

NTPC Green Energy Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.

Siddhi Hande

नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी १६ एप्रिलपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील (NTPC Green Energy Limited Job) या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला ngel.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करायचा आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये (NTPC Recruitment) १८२ रिक्त पदे भरली केली जाणार आहे. सिव्हिल इंजिनियर पदासाठी ४० जागा रिक्त आहेत.इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी ८० जागा तर मेकॅनिकल इंजिनियर पदांसाठी १५ जागा रिक्त आहे. एचआर एक्झिक्युटिव्हसाठी ७ जागा तर फायनान्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी २६ जागा रिक्त आहेत.

या भरती मोहमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. त्यांनी पदानुसार बीटेक/ एमई/ एमटेक/ एमबीए/ पीजी डिप्लोमा/ सीए/ पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे असावी. त्यांच्याकडे कामाचा अनुभव असावा. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

तुम्ही सर्वप्रथम एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर संबंधित भरती लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्टर करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा. यानंतर लॉग इन करुन फॉर्म पुन्हा भरा. यानंतर शुल्क भरुन अर्ज सबमिट करा. या फॉर्मचे प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT