Government Job Saam Tv
naukri-job-news

NCRTC Recruitment: इंजिनियर झालात? सरकारी नोकरीची संधी; NCRTC मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

NCRTC Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. एनसीआरटीसीमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या कंपनीत भरती निघाली आहे. तुम्ही विविध पदांसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही ncrtc.in या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी २४ एप्रिल २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एनसीआरटीसीमध्ये ७२ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदासाठी १६ जागा रिक्त आहे. ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी १६ जागा रिक्त आहेत. ज्युनिअर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनिअर इंजिनियर सिविल प्रोग्राम असोसिएट, असिस्टंट एचआर, असिस्टंट कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी, ज्युनिअर मेंटेनर इलेक्ट्रिकल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ३ वर्षांचा डिप्लोमा/आयटी/ बीसीए / बीएससी कॉम्प्युटर सायन्स/ बीबीए / बॅचरल डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला ncrtc.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवर करिअर सेक्शनवर जायचे आहे.

यानंतर नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे आहे. यानंतर सर्व माहिती भरा.

यानंतर शुल्क भरुन तुम्ही अर्ज दाखल करा. याची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

इंजिनियरिंचे शिक्षण पूर्ण केले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तुम्ही करिअरची सुरुवात करण्यासाठी ही नोकरी(Job) करु शकतात. या नोकरीतून तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT