Government Job : सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; 'महापारेषण'मध्ये शेकडो पदांसाठी भरती सुरु, अर्ज कुठे अन् कसा कराल? वाचा

mahatransco bharti 2025 : सरकारी नोकरीची सुवर्ण संधी हाती आली आहे. 'महापारेषण'मध्ये शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज कुठे आणि कसा कराल? वाचा सविस्तर
Mahapareshan
MahapareshanSaam tv
Published On

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी कामाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कंपनीतील विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रकिया सुरु करण्यात आली आहे. या सरकारी नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार राज्य विद्युत मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३ एप्रिल २०२५ पर्यंत देण्यात आली आहे.

Mahapareshan
Electricity Outage : वीजबिल थकलं काही घरांचं, पण वीजपुरवठा बंद केला अख्ख्या गावाचा; महावितरणचा अजब कारभार

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी अशी सात परिमंडल कार्यालये आहेत. तर ऐरोली येथे राज्य भार प्रेषण केंद्र आहे. सात परिमंडल कार्यालयांच्या वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्यातील मंडल कार्यालयाअंतर्गत वेतनगट ३ मधील मंडल स्तरी सेवा ज्येष्ठतेतील निम्नस्तर लिपीक ( वित्त व लेखा) ही रिक्त पदे एकत्रित करून सरळसेवेद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत.

महापारेषण कंपनीच्या भरतीअंतर्गत एकूण २६० रिक्त भरली जाणार आहेत. या पदासाठी शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेचा पदवीधर, एमएस सीआयटी परीक्षा उत्तीर्ण अशी पात्रता आहे. या पदासाठी कोणत्याही कामाच्या अनुभवाची गरज नाही.अर्ज सादर करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे.

Mahapareshan
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजनेत होणार बदल? वाचा सविस्तर

उमेदवाराचं किमान वय हे १८ वर्षे ते कमाल वय ३८ वर्ष असणे गरजेचे आहे. वयोमर्यादेसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं प्रमाणत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सर्व मागासवर्गीय, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथील राहणार आहे.

Mahapareshan
Success story : दोन वेळ खाण्याची भ्रांत, वडिलांना महिना १२ हजार पगार; लेकीला मिळाली ४५ लाखांच्या नोकरीची ऑफर

माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांच्या सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे इतका राहणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षे असणार आहे.

कशी असेल परीक्षा?

पदभरतीसाठी एकूण १५० गुणांची ऑनलाइन परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. भरतीविषयी अधिक माहिती महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com