PNB Recruitment: खुशखबर! पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Punjab National Bank Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ऑफिसर पदासाठी सध्या भरती सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे.
 PNB Recruitment
PNB RecruitmentSaam Tv
Published On

नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहेत. बँकेत सध्या बंपर भरती निघाली आहे. याबाबत बँकेने जाहिरातदेखील प्रसिद्ध केली आहे. ३५० रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२५ आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी www.pnbindia.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. (Punjab National Bank Recruitment)

 PNB Recruitment
Government Job: पर्यावरण मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; २ लाख रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या

पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर क्रेडिट, ऑफसर इंडस्ट्री, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर recruitmentho@pnb.co.in या ईमेलवर संपर्क साधा.

क्रेडिट ऑफिसर पदासाठी २५० जागा रिक्त आहे. इंडस्ट्री ऑफिसर पदासाठी ७५ जागा रिक्त आहे. आयटी मॅनेजर आणि सिनियर आयटी मॅनेजर पदासाठी प्रत्येकी ५-५ जागा रिक्त आहेत.इतर अनेक पदांसाठीदेखील रिक्त जागा आहेत.

पंजाब नॅशनल बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च आहे.

 PNB Recruitment
Governement Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात भरती सुरु; पात्रता अन् अर्ज कसा करावा?

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.pnbindia.in या वेबसाइटवर जायचे आहे.

या वेबसाइटवर Recruitment सेक्शनवर जाऊन अर्ज करायचा आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरावी.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर शुल्क भरा. या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील लोकांना १५० रुपये शुल्क भरायचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये रिजनिंग, गणित, इंग्रजी, प्रोफेशनल नॉलेजसंबंधित प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.

 PNB Recruitment
SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार दीड लाख रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये रिजनिंग, गणित, इंग्रजी, प्रोफेशनल नॉलेजसंबंधित प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.

 PNB Recruitment
Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com