Bank Job Saam Tv
naukri-job-news

Bank Job: बँकेत नोकरी अन् ७८००० रुपये पगार; अर्ज कुठे आणि कसा करावा?

National Housing Bank Recruitment: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल हाउसिंग बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.सरकारी बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नॅशनल हाउसिंग बँकेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि डेटा सायंटिस्ट पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (NHB Recruitment)

नॅशनल हाउसिंग बँकेत मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट www.nhb.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. मुदतीनंतर या नोकरीसाठी कोणीही अर्ज करु नये.

या नोकरीसाठी MMG स्केल III, MMG स्केल II पदासाठी भरती केली जाणार आहे. एकूण १९ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

नॅशनल हाउसिंग बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत एमबीए/सीएफए / आयसीएआय / आयसीडब्ल्यूएआय पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.डेटा सायंटिस्टस / कम्प्युटिंग अँड स्टॅस्टिस्टिक्स पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करावेत. (Bank Jobs)

या नोकरीसाठी २३ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ६३,८४० ते ७८,२३० रुपये वेतन मिळणार आहे. (Government Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT