Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: दहावी पास उमेदवारांना नगरपरिषदेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर...

Nagarparishad Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नगरपरिषदेत शिक्षक, लिपिक, लॅब असिस्टंट अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. जवळपास ३२ जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

नगर परिषदेत मोठी भरती करण्यात येणार आहे. नगर परिषदेअंतर्गत महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. शिक्षक, निदेशक, संगणक लिपीक, प्रयोग सहाय्यक, शिपाई या पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायच आहे.कनिष्ट महाविद्यालयासाठी या जागा भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी नगरपरिषदेद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

नगर परिषदेत शिपाई, प्रयोगशाळा असिस्टंट, क्लर्क या पदांसाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. ९वी, १० वी, १२वी पास असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी एम.ए इन इंग्लिश, बी. एड, एम. ए, समाजशास्त्र बी. एड उत्तीर्ण उमेदवार इंग्रजी, हिंदी, समाजशास्त्र शिक्षक या पदासाठी अर्ज करु शकणार आहेत. गणिताच्या शिक्षकासाठी एम.एस.सी.बी.एड ही पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.भौतिकशास्त्र विषयासाठी एम.एस.सी.बी.एड पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.संगणक शिक्षकासाठी बी.ई किंवा एम.एस.सी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. लॅब असिस्टंट पदासाठी १२ वी पास उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर शिपाई पदासाठी ९ वी पास उमेदवार अर्ज करु शकणार आहेत.

३२ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. हिंगणघाट येथे नोकरीचे ठिकाण आहे. या नोकरीसाठी १६ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी १६ जुलैसाठी उमेदवाराने जी.बी.एम.एम हायस्कुल आणि कनिष्ट महाविद्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT