NABARD Recruitment Saam tv
naukri-job-news

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, २७ लाखांचं पॅकेज, अर्ज कुठे अन् कसा करावा?

NABARD Recruitment 2025: नाबार्डमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नाबार्डमध्ये सध्या डेटा सायंटिस्ट आणि एआय इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत सरकारच्या प्रमुख सरकारी बँकेत भरती जाहीर केली आहे.नाबार्डमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नाबार्डने स्पेशलिस्ट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरुदेखील झाली आहे. (NABARD Recruitment)

नाबार्डमधील नोकरीसाठी १६ जून २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे. यासाठी नाबार्डची अधिकृत वेबसाइट www.nabard.org वर जाऊन अर्ज करायचा आहे.

नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास, कृषी वित्त आणि सहकारी संस्थाना प्रोत्साहन देण्याचे काम करते. या बँकेत डेटा सायंटिस्ट/ AI इंजिनियर / डेटा इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

पात्रता

डेटा सायंटिस्ट / AI इंजिनियर आणि डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई / बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा एम.ई / एमटेक / एमसीएस कॉम्प्युटर सायन्स / आयटी / डेटा सायन्स / मशीन लर्निंग / एआय डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत डेटा मॅनेजमेंट पदासाठी कोणत्याही विषयात मास्टर्स पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत कामाचा अनुभव असावा.

डेटा सायंटिस्ट / एआय इंजिनियर पदासाठी २१-३० लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. डेटा इंजिनियर पदासाठी १८ ते २७ लाख रुपये पगार मिळणार आहे. डेटा सायंटिस्ट कम बीआय डेव्हलपर पदासाठी १५ ते २१ लाख आणि स्पेशलिस्ट पदासाठी १२-१५ लाख रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते ४० वयोगटातील असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू, अनुभवाच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

SCROLL FOR NEXT