Mumbai University Recruitment Saam Tv
naukri-job-news

Mumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती;मिळणार ४० हजार रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंजिनिअर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुंबई विद्यापीठात इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे.ज्युनिअर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदासाठी ही भरती घेण्यात येत आहे. यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीने अधिसूचना जाहीर केली आहे.

जर तुमचे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुम्ही या नोकरीसाठी नक्कीच अर्ज करु शकतात. या भरतीमध्ये ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ११ महिन्यांसाठी कंत्राती तत्त्वावर पदभरती होणार आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. मुलाखतीच्या आधारे ही भरती केली जाणार आहे.

एकूण ८ जागांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे. सिव्हिल इंजिनियरसाठी ६ जागा तर इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी २ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

सिव्हिल इंजिनियर या पोस्टसाठई अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी असणे गरजेचे आहे. त्याचसोबत या क्षेत्रातील डिझाइनींग किंवा बांधकामाचा कमीत कमी १ वर्षांचा अनुभव असावा. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रात ३ वर्षांची पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराला किमान १ वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

या दोन्ही पदासाठी दर महिना ४० हजार रुपये पगार देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. मुलाखतीला जाताना नोकरीचा अर्ज सोबत घेऊन जावा.त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन जावी. ही मुलाखत ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ, पूर्व, मुंबई ९८ येथे उपस्थित असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT