Mumbai Metro Job Saam Tv
naukri-job-news

Mumbai Metro Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार मुंबई मेट्रोत नोकरी; पगार २ लाख रुपये ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Metro Recruitment 2024: मुंबई मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई मेट्रोत इंजिनियर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

मुंबईत चांगली नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २ लाख रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीबाबत मुंबई मेट्रोने नोटिफिकेशन जारी केले आहे.

मुंबई मेट्रोत सहाय्यक महाव्यवस्थापक, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता ही पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २७ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२४ आहे. (Mumbai Metro Recruitment)

या नोकरीसाठी तुम्ही mmrcl.com वर जाऊन अर्ज करु शकतात.मुंबई मेट्रोत सहाय्यक महाव्यवस्थापक (सिव्हिल) साठी १ जागा रिक्त आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ५ जागा रिक्त आहे. ज्युनिअर सिव्हिल इंजिनियर पदासाठी १ जागा रिक्त आहे. एकूण ७ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. (Mumbai Metro Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी सिव्हिल इंजिनियर पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केलेला असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असावी.

सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी ८ लाखांचे सीटीसी पॅकेज मिळणार आहे. तर अभियंता पदासाठी ५-६ लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ३५ हजार ते २ लाख रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी २८ डिसेंबर २०२४ पूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

SCROLL FOR NEXT