MSRTC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; २६३ रिक्त पदे; अर्ज कुठे अन् कसा कराल?

ST Mahamandal Recruitment 2025: एसटी महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात २६३ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंजळात विभागीय कार्यालयात भरती करायची आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे ही भरती करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तब्बल २६३ जागा रिक्त आहेत. या नोकरीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात चेक करा. या नोकरीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहहे. १६ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडनध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी www.mhrdnts.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.या नोकरीसाठी तुम्ही ३ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जळगाव येथे पाठवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT