MSRTC Recruitment Saam TV
naukri-job-news

MSRTC Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी; 'या' जागांसाठी सुरु आहे भरती

MSRTC Recruitment 2024 Last Date: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची संधी आहे. समुपदेशक या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर लगेच अर्ज करा.

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. वेगवेगळ्या जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि नियंत्रक विभागाद्वारे या नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात समुपदेशक पदासाठी नोकरीची संधी आहे. महामंडळातील कर्माचाऱ्यांच्या मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासाठी समुपदेशक पदाची नियुक्ती केली जाणार आहे.

या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (M.S.W) किंवा कला शाखेची पदव्युतर पदवी (M.A Psychology)किंवा समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराला समुपदेशन क्षेत्रातील शासकीय, खाजगी संस्थामधील किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

ही नोकरी मानद तत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी नेमणूकीचा कालावधी १ वर्षांचा आहे. आवश्यकेतुनास हा कार्यकाळ वाढवूदेखील शकतात. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. लातूरमध्ये ही नोकरीची संधी आहे. १२ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याबाबत अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Recruitment.aspx या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT