MPSC  Saam Tv
naukri-job-news

Krushi Vibhag Bharti: MPSC अंतर्गत कृषी विभागात भरती; २५८ रिक्त जागा;पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

MPSC Krushi Vibhag bharti 2024: एमपीएससीमार्फक कृषी विभागात भरती केली जाणार आहे. २५८ रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससी कृषी सेवा (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. उप संचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

कृषी विभागात नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. २५८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी अर्जप्रक्रिया २७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२४ आहे. (Agriculture Department Recruitment)

याबाबत सर्व माहिती https://mpsc.gob.in/ या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी असणार आहे. उप संचालक कृषी पदासाठी ४८ जागा रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी पदासाठी ५३ जागा रिक्त आहेत. कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर पदांसाठी १५७ जागा रिक्त आहेत.

याबाबत सर्व माहिती एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Krushi Vibagh Bharti)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT