महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाट्रान्स्को पिंपरी चिंचवडमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. महाट्रान्स्कोमध्ये २३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाट्रान्स्कोमध्ये नोकरीसाठी अर्ज शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ आहे. अप्रेंटिस- इलेक्ट्रिशियन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI (इलेक्ट्रिशियन) (NCVT) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
महाट्रान्स्कोमध्ये नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी कार्यकारी अभियंता, महापारेषण कार्यालय, ए.डी.सं.व.सु. विभाग पिंपरी चिंचवड, सबस्टेशनजवळ, बालाजी नगर, चिंचवड पुणे ४११०३३ येथे अर्ज पाठवायचा आहे. तुम्हाला पिंपरी चिंचवड येथील महापारेषण विभागात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२४ आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना आस्थापना क्रमांक E10202700049 वर नोंदणी करायची आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र जोडायची आहेत.याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वेमध्येही सध्या भरती सुरु आहे. रेल्वेमध्ये तब्बल ३३१५ अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. रेल्वेत टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.