Government Job Saam Tv
naukri-job-news

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील प्रयोगशाळांमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर विभागात ही भरती करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट ब ) आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ५६ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. यातील वरिष्ठ तांत्रिक सहायक पदासाठी ३७ पदे राखीव आहेत. तर विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist) साठी १९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ तांत्रिक सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत फार्मसी (Pharmacy) पदवी प्राप्त केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे.

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (Analytical Chemist)पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युतर पदवी किंवा विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांना ३८,४०० ते १,२२,८०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (Government Job)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती www.fda.maharashtra.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे. (Drug And Food Administraion Recruitment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT