Konkan Railway Job Saam Tv
naukri-job-news

Konkan Railway Job: टेक्निशियन ते स्टेशन मास्तर, कोकण रेल्वेत बंपर भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली; जाणून घ्या सविस्तर

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. टेक्निशियन ते स्टेशन मास्तर अशा अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. कोकण रेल्वेत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इंजिनियर, टेक्निशियन ते स्टेशन मास्टर अशा अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ होती. मात्र, ही तारीख आता वाढवण्यात आली आहे.

कोकण रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवार २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. (Konkan Railway Bharti)

kokanrailway.com या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात.१०वी पास/SSLC/ITI पदवी प्राप्त तसेच इंजिनियरिंग क्षेत्रात डिग्री डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे पोर्टलवर जाऊन रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर लॉग इन करुन सर्व फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. (Kokan Railway Recruitment)

ओएनजीसी भरती

सध्या ओएनजीसीमध्येही भरती सुरु आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ओएनजीसीमध्ये २ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. इंजिनियरिंग अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT